गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन

👤 तुषार शिंगाडे | 📅 13 August 2026 | 👁 25 Views
गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन


कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्रतिष्ठित स्क्रॅप व्यापारी तथा गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. शिवाजी राजाराम इंगळे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. ते गेल्या १४ वर्षांपासून आजारपणाने त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गोंधळी समाजासह कणकवली परिसरात शोककळा पसरली आहे.

कै. शिवाजी इंगळे हे गोंधळी समाजातील सुरुवातीच्या काळातील उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून परिचित होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, गरजू व गोरगरीब व्यक्तींना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अडचणीची वेळ आली, तर मदतीसाठी ते सदैव तत्पर असत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजबांधव, मित्रपरिवार, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्याने समाजाने एक मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

कै. शिवाजी इंगळे यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |