एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 13 August 2026 | 👁 49 Views
एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब (अराजपत्रित) २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची भरती प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्य परीक्षा होऊन जवळपास तीन महिने होत आले असून, अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊनही जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप सर्वसाधारण गुणवत्ता यादी (जीएमएल) जाहीर झालेली नाही. त्यामुळे पुढील टप्प्याची तयारी करायची कशी, असा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.

एमपीएससीने २९ जुलै २०२५ रोजी गट-ब २०२५ पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली पूर्व परीक्षा दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. २३ मार्च २०२६ रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी मुख्य परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि १७ मे रोजी मुख्य परीक्षा पार पडली.

मुख्य परीक्षेनंतर २७ मे रोजी प्रथम उत्तरतालिका, तर १७ जून रोजी अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. अंतिम उत्तरतालिकेनंतर निकालाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन जीएमएल जाहीर होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, १७ जूननंतर जवळपास दोन महिने उलटूनही गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याने उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे.

पुढील टप्प्याची तयारी कशी करायची?

पीएसआय पदासाठी गुणवत्ता यादीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढे शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागते. मैदानी चाचणीसाठी सराव, वेळ आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे जीएमएल लवकर जाहीर झाल्यास पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीची तयारी व्यवस्थित करता येईल. मात्र, आपले नाव गुणवत्ता यादीत आहे की नाही, हेच स्पष्ट नसल्याने अनेक उमेदवार मानसिक संभ्रमात आहेत.

“मुख्य परीक्षा होऊन जवळपास तीन महिने होत आले आहेत. गुणवत्ता यादी जाहीर होत नसल्याने पुढील टप्प्यासाठी नेमकी कशी तयारी करायची, हा प्रश्न आहे. जीएमएल लवकर जाहीर झाल्यास पात्र विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी योग्य नियोजन करता येईल.”


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |