राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 12 August 2026 | 👁 18 Views
राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती
मौजे साखराळे हद्दीतील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता ७ हजार टन प्रतिदिनावरून १५ हजार टन प्रतिदिन करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सहवीजनिर्मिती क्षमता २८ मेगावॅटवरून ६८ मेगावॅटपर्यंत वाढविण्याचा अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र, या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक पूर्वसंमती घेणे अपेक्षित असताना, ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रस्तावित विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम सुमारे ८० ते ९० टक्के पूर्ण झाले असतानाही नागरिकांसमोर चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल सादर करून फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची पूर्वसंमती न घेता विस्तारीकरण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हे संपूर्ण प्रकरण ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विस्तारीकरणाच्या अहवालास विरोध दर्शवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हरकती नोंदवल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अतिरिक्त उपप्रादेशिक अधिकारी, सांगली येथील श्री. प्रमोद रा. माने यांच्याकडे ग्रामस्थांनी हरकतीचे निवेदन सादर केले.विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का, प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक संमती घेण्यात आली होती का आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती काय आहे, याची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |