इस्लामपूर बिजनेस फोरम (IBF)च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री, आम.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते सो सुप्रिया पेटकर यांचा सन्मान करण्यात आला.इस्लामपूर बिजनेस फोरम (IBF) हे उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेले प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना एकमेकांच्या अनुभवातून शिकता येते आणि आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्याची संधी मिळते.
या सत्कार सोहळ्यास उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. आनंदराव मलगुंडे (दादा), उपनगराध्यक्ष मा. खंडेराव जाधव (नाना), पक्ष-प्रतोद मा. प्रा. सौ. अरुणादेवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मा. शहाजी पाटील (बापू), महिला शहराध्यक्षा सौ. पुष्पलता खरात, प्रा. दीपा देशपांडे, मा. रोजा किणिकर, तसेच नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया पेठकर म्हणाल्या हा सन्मान माझ्यासाठी केवळ कौतुकाचा क्षण नाही, तर उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि IBFच्या माध्यमातून अधिक चांगले काम करण्याची नवी प्रेरणा आहे.