१२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध

👤 बारामती प्रतिनिधी | 📅 29 July 2026 | 👁 178 Views
१२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नावरून २९ जुलै रोजी बारामती येथे सरकारविरोधात ‘विश्वासघात दिन’ पाळण्यात आला. समाजबांधवांनी कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या निषेधाची भावना व्यक्त करत आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.

२९ जुलै २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला १२ वर्षे पूर्ण होत आली असून तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळूनही आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आणि विश्वासघाताची भावना निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.

यावेळी आंदोलकांनी शासनाने गेल्या १२ वर्षांत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या समित्या, टीआयएस (TISS) संस्थेची नियुक्ती, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यवाही आणि त्यातून झालेली प्रगती याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली. तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समिती स्थापन करून प्रक्रिया सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.

क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे आणि धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे यांनी यावेळी भूमिका मांडताना, "गेल्या १२ वर्षांत धनगर समाजाची केवळ फसवणूक झाली असून समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जात असेल, तर सरकारने समाजाला गृहीत धरू नये. अन्यथा सरकारविरोधातील निषेध अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा दिला.

धनगर समाजाचे पारंपरिक प्रतीक असलेल्या कपाळावरील भंडाऱ्याऐवजी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधातील संताप व्यक्त केला.

उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्या वतीने नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात विक्रम ढोणे, कल्याणी वाघमोडे, ताई मदने, तानाजी कटरे, सुजित वाघमोडे, विक्रांत काळे, गणपत देवकाते, सुरेश खताळ, जयाप्पा खरात, अंकुश मुढे, बाबू मदने, नवनाथ सूळ, विनय शेळके, संतोष तोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार | आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान | "तुकाराम मुंढे यांना किमान दोन वर्षे अन्न व औषध प्रशासनात ठेवावे; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या कारवायांना सातत्य द्यावे"आमदार सत्यजित दादा तांबे | १२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध | सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त | बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा |