सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती

👤 संतोष एडके तासगाव | 📅 28 July 2026 | 👁 61 Views
सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती


सांगली जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
​मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, आयटी/बीपीओ, बँकिंग व फायनान्स सर्व्हिस तसेच इतर विविध क्षेत्रांतील १९ नामांकित आस्थापना व कंपन्यांच्या माध्यमातून ५०८ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगारइच्छुक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
​ऑनलाईन नोंदणी आवश्यक :
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/PsfNy355gaG1D5JA8 या गुगल फॉर्मद्वारे आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरून मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी योग्य नमूद करावा, तसेच नोंदणी केल्यानंतर मेळाव्याबाबतची पुढील माहिती मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल, असे यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
​दिनांक : ३० जुलै २०२६
​स्थळ : श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली
​अधिक माहितीसाठी संपर्क : (०२३३) २९९०३८३
​ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"गरिबांची साथ हीच माझी ताकद; म्हणूनच दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत" – महादेव जानकर | सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती | धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारले १५ कोटींचे भव्य 'शेतकरी भवन' व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय | वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू | गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. |