मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरू सरुताई माऊली यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार दि. २९ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर यांनी दिली .
या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक ,सकाळी सहा वाजता नामस्मरण, सकाळी सात आरती, सकाळी नऊ आरती व नामस्मरण, सकाळी दहा ते अकरा तीस ह.भ. प.मनोहर महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी बारा वाजता माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व सौ उर्मिला येळगावकर यांच्या शुभहस्ते माऊलींची महारती होणार असून दुपारपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा तीस ते पाच या वेळेत श्री हनुमान भजनी मंडळ मायणी, वाल्मिकी एकतारी भजनी मंडळ, भादोले, अंजनी भजनी मंडळ, मोराळे व कानकात्रे भजनी मंडळ यांच्या सुश्राव्य भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.