प्रथमच प्राथमिक शाळा अनफळे या ठिकाणीही बाल दिंडीचे आयोजन शाळेमार्फत करण्यात आले होते यावेळी मुलांनी या बाल दिंडीत उस्फुर्त सहभाग नोंदवला शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे परिसरात कौतुक होत आहे
गेले महिनाभर आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला दिसून येत आहे विठ्ठलाच्या भेटीची आस लागून राहिलेले वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे याच अनुषंगाने मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते बाल दिंडी पूर्णपणे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली या बालदिंडीत संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, श्री विठ्ठल,रुक्मिणी वेशभूषा साकारन्यात आल्या होत्या या वेशभूषेने उपस्थित यांची मन जिंकली हरिनामाचा गजर,टाळ मृदंगाचा नाद,अभंग व देशभक्तीपर घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला यावेळी विविध विषयावरती विद्यार्थ्यांनी जनजागृती केली
यावेळी मुख्याध्यापक सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक व ग्रामस्थ यांनी कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला यावेळी वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन गेले होते..