पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप

👤 जितेंद्र मोरघा पालघर | 📅 25 July 2026 | 👁 782 Views
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप

पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज, दि. २५ जुलै २०२६ रोजी सूर्या नदीकाठावरील बोरशेती व किराट परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. हा सेवा उपक्रम भगेरिया इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

या मदत वितरण कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक सरपंच, उपसरपंच तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संकटकाळात समाजाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. पूरामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही गरज भासल्यास मदतीचा हात कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

"संकटाच्या काळात राजकारण नव्हे, तर सेवा" हा भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र असल्याचे सांगत पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. जनतेची सेवा हीच सर्वोच्च बांधिलकी मानून प्रत्येक संकटात नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |