युवा नेते प्रफुल्ल सुद्रिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 347 Views
युवा नेते प्रफुल्ल सुद्रिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कळसुली ग्रामपंचायत परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित असलेल्या प्रफुल्ल सुद्रिक यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचा, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा आणि जनसामान्यांशी असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम र समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. प्रफुल्ल सुद्रिक यांच्या पुढाकारातून उपस्थितांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची सामूहिक शपथही घेण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला सरपंच सचिन पारधीये, उपसरपंच राजेंद्र दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक, नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्या भावना तावडे, सोसायटी संचालक बाबाजी मुरकर, ग्रामसेवक प्रशांत वर्धम, अरुण दळवी, काका धरणकर, तातू गावंकर, दीपक मेस्त्री, स्वप्नील गोसावी, बाबू लाड, चंद्रशेखर चव्हाण, अक्षय मुरकर, प्रसाद भोगले, मोहन दळवी, तुषार दळवी, शत्रुघ्न परब, मधुकर चव्हाण, मंगेश दळवी, सुलभा कदम, सदानंद पुजारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. विशेषतः प्रफुल्ल सुद्रिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत अशा समाजोपयोगी उपक्रमांची भविष्यातही सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड |