जि.प. शाळा कटरेवाडीत 'पंचम कार्यक्रम' उत्साहात; वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 22 July 2026 | 👁 545 Views
जि.प. शाळा कटरेवाडीत 'पंचम कार्यक्रम' उत्साहात; वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन
आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटरेवाडी येथे विविध राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक विषयांचा समावेश असलेला 'पंचम कार्यक्रम' उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, राष्ट्रध्वज दिनानिमित्त माहिती तसेच जागतिक मेंदू दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक श्री. नानासाहेब झुरे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच शिक्षक हे समाज घडवणारे शिल्पकार असून शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी ओळखावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकाळातील जनहिताच्या निर्णयांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी तसेच शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणासह विविध शैक्षणिक योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.

२२ जुलै १९४७ रोजी भारताच्या राष्ट्रध्वज 'तिरंगा'ला अधिकृत मान्यता मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच जागतिक मेंदू दिनानिमित्त मेंदूचे कार्य, त्याचे आरोग्य आणि सुरक्षिततेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय उपयोगी लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी किमान दोन झाडे लावण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्री. नानासाहेब झुरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी सेविका शोभा मोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |