जिंतूरमध्ये पतंजली योग समिती व भारत स्वाभिमानची राज्यस्तरीय बैठक संपन्न

👤 बळीराजा भराडे परभणी | 📅 18 July 2026 | 👁 223 Views
जिंतूरमध्ये पतंजली योग समिती व भारत स्वाभिमानची राज्यस्तरीय बैठक संपन्न
योगाचा प्रसार, संघटन बळकटी आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा; प्रल्हादजी हर्बक (माऊली) यांचे मार्गदर्शन
जिंतूर येथील साई सृष्टी गार्डन, वरुड रोड येथे महाराष्ट्र पश्चिम राज्यातील भारत स्वाभिमान व पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची एकदिवसीय बैठक पार पडली.
बैठकीस प्रल्हादजी हर्बक (माऊली), भारत स्वाभिमान सह राज्य प्रभारी (महाराष्ट्र पश्चिम) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक गावात नियमित योगवर्ग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच पतंजली योग समितीचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य करावे, सदस्य नोंदणी, जनजागृती आणि आगामी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी धोंडीरामजी शेप (भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी, परभणी तथा राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र पश्चिम), वसंतरावजी देशमुख (जिल्हा कोषाध्यक्ष, परभणी), निखिलजी वंजारे (पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी, परभणी), पुरुषोत्तमजी अंभूरे (भारत स्वाभिमान तहसील प्रभारी, जिंतूर), अॅड. गोपाळराव देशपांडे (पतंजली योग समिती तहसील प्रभारी), लखुजी जाधव (पतंजली किसान सेवा समिती प्रभारी, जिंतूर), सचिनजी रायपत्रीवार (सोशल मीडिया तहसील प्रभारी, जिंतूर), कामाजी जवादे (सोशल मीडिया तहसील प्रभारी, गंगाखेड) तसेच ज्ञानोबाजी बरसाले (भारत स्वाभिमान तहसील प्रभारी, सेलू) उपस्थित होते.
बैठकीत संघटन विस्तार, योग प्रशिक्षण, सामाजिक उपक्रम, सदस्य नोंदणी आणि आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पतंजली योग समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*'सुरक्षित बालपण' व्याख्यानमालेने जागविली बालकांची सजगता: सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय शिबिराची दिमाखात सांगता!* | कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला |