मतदार यादी पुनर्निरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे कमी होऊ नये,याची दक्षता घ्या- वैभव नाईक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 July 2026 | 👁 246 Views
मतदार यादी पुनर्निरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे कमी होऊ नये,याची दक्षता घ्या- वैभव नाईक
पिंगुळी,तेंडोली,ओरोस, वेताळबांबर्डे,पावशी जि. प. विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकित केले आवाहन
मतदार यादी पुनर्निरिक्षण ( एस.आय.आर.) अभियानात शिवसेनेच्या बीएलए यांनी आपल्या बुथवरील मतदारांची नोंदणी झाली कि नाही याची पडताळणी करावी. पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये याची दक्षता घेऊन शासकीय बीएलओ सोबत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून सक्षमपणे काम करावे. बोगस मतदारांची नावे असतील तर शासकीय बीएलओंच्या निदर्शनास आणून ती मतदार यादीतून वगळली पाहिजेत.त्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील बीएलए यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे, पावशी या जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी वैभव नाईक यांनी संघटनेचा आढावा घेत संघटना वाढीबाबत आणि एसआयआर अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, देशात महागाई वाढली आहे.स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत शेकडो कोटींची चोरी झाली. सिंधुदुर्गात स्मार्ट वीज मीटर, अणुऊर्जा प्रकल्प, मायनींग प्रकल्प जबरदस्तीने लादले जात आहेत. जनतेला सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही. लाडकी बहिणी योजनेतुन हजारो महिलांना वगळण्यात आले आहे. अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्रातील आणि राज्यातील भाजप महायुती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपल्या आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे असे आवाहनही वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर,युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर,
पिंगुळी येथे विभागप्रमुख जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, उपविभागप्रमुख सचिन ठाकूर, दत्ताराम लाड,ओंकार गायचोर,शाखाप्रमुख नामदेव तावडे, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, ग्रा. प. सदस्य तृप्ती सावंत, सिद्धी मेस्त्री,बाबाजी सावंत, युवासेना शाखाप्रमुख सचिन धुरी,बुथप्रमुख बंडया कोरगावकर, वासुदेव जोशी,प्रथमेश जोशी,संतोष पवार,विजय ठमळकर, राजन वारंग, सूरज घाटकर,शरद माळकर,संतोष कोरगावकर,संदीप सावंत.

तेंडोली येथे उपविभाग प्रमुख महेश वेळकर, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, युवासेना विभागप्रमुख कौशल राऊळ,शिवसेना शाखाप्रमुख सुधीर लुडबे,सुनील हळदणकर,कृष्णकांत परब,किशोर धुरी, बुथप्रमुख विठ्ठल माधव, उमेश प्रभू,माजी सरपंच रीती राऊळ, ग्रा. प. सदस्य दिया आवळे,सहदेव प्रभू,प्रशांत पाटकर.

ओरोस येथे विभागप्रमुख रवींद्र कदम, उपविभाग प्रमुख महादेव परब, भगवान परब,कसाल शहर प्रमुख नंदू आंबेरकर, प्रशांत परब,हरिश्चंद्र वायंगणकर, युवासेना उपविभागप्रमुख मनीष पारकर, शाखाप्रमुख, गिरीश मर्तल, संतोष शिरवंडकर,गणेश मेस्त्री,महिला विभागप्रमुख दर्शना म्हसकर,सुरेखा ओरोसकर,प्रसाद गावडे.

वेताळबांबर्डे येथे विभागप्रमुख नरेंद्र राणे, नारुर उपसरपंच मुकुंद सरनोबत, बाजीराव झेंडे,शाखाप्रमुख विठ्ठल दळवी,धाकू परब, रामचंद्र कदम, शैलेश घाटकर, रामदास मेस्त्री,संतोष कदम, दिलीप तिवरेकर,रफिक मुजावर,मिलिंद दळवी,आनंद सामंत.

पावशी येथे उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, शाखाप्रमुख सु. वि. पेडणेकर,मिलिंद परब, युवासेना विभागप्रमुख मनीष तोटकेकर,बुथप्रमुख गणेश वायंगणकर,सदाशिव पालव,बाळू पालव,लीलाधर अणावकर,पूनम पवार,दाजी पवार, मंदार कोठावळे, कमलाकर जाधव,प्रसाद शेलटे,ओंकार साईल,रुपेश शिरोडकर, विकास बांबूळकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |