कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या विद्यार्थ्यांकडून पियाळी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी चित्रकला स्पर्धा उत्साहात

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 July 2026 | 👁 140 Views
कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या विद्यार्थ्यांकडून पियाळी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी चित्रकला स्पर्धा उत्साहात
पियाळी येथील प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे रावे वाले कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व देशभक्तीपर विषयांवर आकर्षक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमाला उपसरपंच विजय मुरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक कदम सर तसेच सर्व शिक्षकांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली असून कला, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आयोजनाबद्दल रावे वाले कृषी महाविद्यालयाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |