गोमातेच्या संवर्धनासाठी बेवनूर गोशाळेचे उल्लेखनीय कार्य; धर्मेश शहा यांची प्रशंसा
👤 अनिल मदने जत |
📅
16 July 2026 |
👁 178 Views
जत तालुक्यातील बेवनूर येथे गौसेवक आणि समस्त महाजन चे सर्वेसर्वा गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. द्वारकाई नाना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बेवनूर, ता. जत, सांगली. संचलित गोशाळा बेवनूर या ठिकाणी गोसेवक धर्मेश शहा आणि त्यांच्या टीमने भेट दिली. या वेळी या टिमने अत्यंत चांगल्या पद्धतीने गोमातेबद्दल माहिती दिली. गो संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. आणि संपूर्ण गोशाळेची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थि जत पंचायत समितीच्या सभापती सौ. अर्चनाताई पाटील, शेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. शिवाजीराव खिलारे आणि बेवनुरचे सरपंच सुभाष कांबळे यांचा समस्त महाजन संस्था मुंबई, यांच्या वतीने धर्मेश भाई शहा यांच्या हस्ते शील्ड देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पोपटराव शिंदे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या श्रीमती द्वारकाई सरगर, गोशाळेचे आधारस्तंभ किरण गायकवाड, गोसेवक अक्षय बनसोडे,गोसेवक बंडाभाऊ कांबळे, विकास सोसायटीचे संचालक दादासाहेब सरगर (पाटील) पिंटू यमगर दाजी, सुनील कांबळे, विकास सोसायटीचे चे संचालक भाऊसाहेब शिंदे, आणि वाळेखिंडी केंद्रप्रमुख के.जी गायकवाड. केराप्पा सरगर, विलास सरगर, डॉ. नवनाथ सरगर शुभम कोळेकर, बंडां वाघमारे, विशाल कांबळे, आदी जण उपस्थित होते. गो सेवक गिरीश बाई शहा म्हणाले की, द्वारकाई नाना सेवाभावी संस्था बेवनुर यांनी गोशाळा उत्तम प्रकारे चालवलेली असून या गो शाळेचे संस्थापक मारुती सरगर यांचे कार्य खरेच उल्लेखनीय आहे. या गो शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व सेवक गिरीश शहा यांनी दिले.