ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 241 Views
ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती
कणकवली - ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हरकुळ गावचे सरपंच आनंद ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाब रोप देऊन स्वागत केले. गावातील 10 वी 12 वी व विशेष प्राविन्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्तित गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांनी शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करने गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपला पाया आताच मजबूत करून पुढील ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच वेगवेगळ्या कोर्सची माहिती ही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन घेऊन मुलांनी आपली वाटचाल करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी देखील मुलांचे अभिनंदन केले व ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या ह्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. आताच Ai च्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षण हे मूलभूत असून त्या बरोबर आधुनिकता पण आत्मसात करने गरजेचे आहे. गावातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता आपल्यातील कोणतरी उद्या मोठा उद्योगपती, डॉक्टर, इंजिनियर होऊन आपल्या गावाचे नाव उज्वल करेल ह्या शुभेच्छा.
प्रा.डॉ.नौकुडकर सर, वर्देकर सर, गावचे सरपंच आनंद ठाकूर यांनी दखील गुणवंत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर, सरपंच आनंद ठाकूर, माजी उपसभापती बाबासाहेब वर्देकर, नवकुटकर सर, माजी उपसरपंच आयुब पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष राजु पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर, चंद्रकांत परब, पूनम तेली, ग्रामसेवक गंगावणे भाऊ, पोलीस पाटील संतोष तांबे, रामचंद्र नारकर गुरुजी, बाबुल पटेल, निलेश तेली, उमेश सापळे, सरफराज शेख, डांगे सर, ओमप्रकाश ताम्हाणेकर, स्वप्नील वर्देकर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |