पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 200 Views
पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर
पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा पावसाची दडी, भातशेती सुकली,जमिनीला भेगा;
जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यानी कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळेस माजी जि.प.सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री,माजी सभापती बंडया मांजरेकर,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे,तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार,भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ.विजय कुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण,मिठबाव सरंपच भाई नरे,ग्रा.पं.सदस्य रिया चव्हाण,राजू जठार,दिनेश मुद्रस,रविंद्र चव्हाण, सुनील चव्हाण, देविदास चव्हाण, सिद्धेश जगताप, विठोबा चव्हाण,राजेश भोगले,राजू वळंजू, अशोक भोगले,अजय चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी देवीदास चव्हाण व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ठिकाणी मी व प्रशासकीय अधिकारी पाहणी करायला आलो आहोत.या यंत्रणेमार्फत शेतक-यांना काय मदत करु शकतो.कोणत्या निकषात बसवून मदत कशी करायाची यासाठी पाऊले उचलू. अशी ग्वाही यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल |