प्रसाद मसुरकर 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' ने सन्मानित.

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 July 2026 | 👁 283 Views
प्रसाद मसुरकर  'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' ने सन्मानित.
माध्यमिक विद्या मंदिर कनेडी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक तसेच हरकुळ बुद्रुक गावचे सुपुत्र प्रसाद नारायण मसुरकर यांना गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ देऊन कुडाळ येथील कार्यक्रमात मिलिंद नाईक सभापती पंचायत समिती कुडाळ, गुरुनाथ सडवेलकर जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प,सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यातील आठ गुणवंत शिक्षकांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रसाद मसुरकर यांनी गेल्या २२ वर्षापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वक्तृत्व , निबंध, वादविवाद याबाबतचे राज्यपातळीवरीलउपक्रम प्रशालेतील विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण तरुणी यांच्यासाठी राबवित असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. तसेच सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित विविध कार्यक्रमात प्रमुख वक्ता आणि मार्गदर्शक म्हणून व्याख्यान देत आहेत.
प्रसाद मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील विविध स्पर्धेत, जिल्हा आणि राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत यश संपादन केले असून दोन लाखांपेक्षा जास्त रक्कमेची रोख रक्कमेची पारितोषिके प्राप्त केली आहेत.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किरण चौगुले यांनी कोणताही प्रस्ताव न स्वीकारता "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" साठी निवड केली होती. मसुरकर यांना आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ४५ पेक्षा जास्त सेवाभावी संस्था, निमशासकीय संस्था आणि शासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.

प्रसाद मसुरकर यांच्या या उल्लेखनीय यशानिमित्त कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीशजी सावंत आणि पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बी एम बुरान आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |