सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव वापरुन अंकुश कदम यांनी चुकीचा गैरसमज पसरु नये–संदीप कदम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 235 Views
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव वापरुन अंकुश कदम यांनी चुकीचा गैरसमज पसरु नये–संदीप कदम
हिंमत असेल तर त्यांनी मोर्चा काढून दाखवावाच...! आम्ही प्रतिमोर्चा काढू अंकुश कदम यापूर्वीच्या दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठे होते ? ; स्विकृत जिल्हा परिषद सदस्यासाठी हा त्यांचा खटाटोप
अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ निनावी बॅनर रात्रीच्या वेळी लावताना ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्यानंतर किरकोळ धक्काबुक्की झाली.मुळात औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याने मुणगे गावात एकमुखी विरोध आहे. या पार्श्वभूमीवर ती घडलेली घटना आहे. जर 15 ते 20 जणांनी रोहित कदम याला मारहाण केली. मग तो पत्रकार परिषदेत स्वत: उभा कसा होता ? अंकुश कदम यापूर्वीच्या जिल्ह्यातील दलित बांधवांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये आम्ही लढत असताना कुठे होते ? भाजपच्या अणुऊर्जा प्रकल्पांना आतून पाठींबा आहे. जे लोक त्या घटनेच्यावेळी उपस्थित नाहीत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणाही करणार नाही. अंकुश जाधव व भाजपचे कार्यकर्ते यांनी मोर्चाचा इशारा दिला. हिंमत असेल तर त्यांनी मोर्चा काढून दाखवावाच आम्ही या खोट्या गुन्ह्यांमध्ये समाजाची बदनामी होवू देणार नाही.आम्ही प्रतिमोर्चा काढू असा इशारा बुद्धिस्ट फेडरेशनचे कार्याध्यक्ष संदीप कदम यांनी दिला.
कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आणि मुणगे ग्रामस्थांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, मुणगे उपसरपंच दशरथ मुणगेकर, खुडी सरपंच दीपक कदम, नगरसेवक लुकेश कांबळे, प्रकाश, मुणगेकर, मनोहर मुणगेकर, देविदास मुणगेकर, बौद्धाचार्य ल. का. कदम, चंद्रकांत मुणगेकर यांच्यासह मुणगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
संदीप कदम म्हणाले, औष्णिक प्रकल्पाच्या मागून राजकीय विरोधातून ॲट्रोसिटीचा वापर या घटनेत करण्यात आला आहे. अंकुश जाधव हे या घटनेचा वापर करुन समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचा अजेंठा अंकुश जाधव चालवत आहेत. कारण स्विकृत जिल्हा परिषद सदस्यासाठी हा त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुजित जाधव म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव वापरुन अंकुश कदम यांनी चुकीचा गैरसमज पसरु नये.मुणगे येथे झालेल्या घटनेत मारहाण झाली असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, या घटनेत पुरेशा आधाराशिवाय अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मारहाण करताना कोण जात विचारत नाही. त्यामुळे भविष्यात चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव विनापरवानगी वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

मुणगे उपसरपंच दशरथ मुणगेकर म्हणाले, ग्रामसभेने अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाचा ठराव मंजूर केला आहे. मी मुणगे गावाचा उपसरपंच म्हणून काम करत आहे. मला केव्हाही गावात अशी वागणूक इतर समाजातून मिळालेली नाही. गावात सामाजिक सलोखा कायम आहे. गावात जातीच्या आधारावर भेदभाव किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल, अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे. माजी खा. भालचंद्र मुणगेकर यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल गावाने जाहिर सत्कार करत सन्मानच केला.

अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ते नेहमीच पीडितांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. मात्र, अॅट्रॉसिटी कायद्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ देणार नाहीत.या घटनेत सखोल चौकशी व्हावी , यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांची आम्ही भेट घेतली आहे. खोटा गुन्हा घालून इतर समाजातील लोकांना त्रास देवू नये ही भूमिका आमच्या समाजाची आहे, असे या संघटनांच्यावतीने संदीप कदम यांनी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |