​कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र दळवी यांची एकमताने निवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 160 Views
​कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र दळवी यांची एकमताने निवड
कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र पांडुरंग दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी नूतन उपसरपंच दळवी यांचे अभिनंदन केले.
​निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांनी नूतन उपसरपंच राजेंद्र दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांनी दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
​कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी माजी सरपंच अतुल दळवी, उपसरपंच गजानन मटकर, जिल्हा परिषद सदस्य. शितल. दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सोसायटी चेअरमन रामचंद्र नाईक तसेच ग्रामविकास अधिकारी प्रशांत वर्धम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
​या निवडीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई, नंदकुमार परब, अरुण दळवी, प्रवीण दळवी, दीपक मेस्त्री, जयवंत परब, कृष्णा दळवी, रवी दळवी, अमित दळवी, स्वप्नील गोसावी, अनिल दळवी, संतोष दळवी आणि दिनकर दळवी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​नूतन उपसरपंच राजेंद्र दळवी यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण |