जि.प. शाळा क्र. ३, कणकवली येथे माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून गणित व बुद्धिमत्ता विकास उपक्रमाचा शुभारंभ

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 73 Views
जि.प. शाळा क्र. ३, कणकवली येथे माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून गणित व बुद्धिमत्ता विकास उपक्रमाचा शुभारंभ
कणकवली, दि. ६ जुलै : सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय (जि.प. शाळा क्र. ३), कणकवली येथे विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, तर्कशक्ती तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून स्पर्धा परीक्षा, गणित व बुद्धिमत्ता विकास उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम ४ जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत नियमितपणे राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. मुकुंद रवींद्र चिकोडी (M.Sc. Mathematics, B.Ed., DSM), सध्या गुरुकुल अकॅडमी येथे गणित विषयाचे मार्गदर्शन करत असून, त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, गणित व बुद्धिमत्ता विकास या विषयांचे वर्ग संपूर्णपणे निःशुल्क घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, ग्रामस्थ, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा नियमित लाभ घेऊन आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर घालावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

माजी विद्यार्थी संघाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून, आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी Spoken English उपक्रमही सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

माजी विद्यार्थी संघाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणावर स्वागत व कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |