मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 101 Views
मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला तालुका समन्वयकपदी पूजा करलकर, तालुका सह समन्वयकपदी माधुरी जावकर, उपतालुका संघटकपदी रश्मी परुळेकर, शहर संघटकपदी राधिका मोंडकर, मालवण उपशहर संघटकपदी गौरी मयेकर, योगिता गावकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपूटे यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पक्षसंघटना अधिक बळकट करणे, महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे, जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात पक्षवाढ, संघटन मजबुती, जनसेवा, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितिन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी,महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, उमेश चव्हाण, तृप्ती मयेकर, अनिता गिरकर, योगेंद्र गावकर, निलेश दुदवडकर, रवी तळाशीलकर, रवी मिटकर, अन्वय प्रभू, राका रोगे, ॲड. सुमित जाधव, सुशील तारी, बंड्या सरमळकर, गणपत आडिवरेकर, तपस्वी मयेकर, राजा शंकरदास, मनोज मोंडकर, किशोर गावकर, पॉली गिरकर, किरण चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, वासुदेव गावकर, सुप्रिया मडये, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |