पिंगळी बुद्रुक येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 'सहकार सप्ताह' उत्साहात साजरा

👤 आकाश दडस सातारा | 📅 06 July 2026 | 👁 66 Views
पिंगळी बुद्रुक येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 'सहकार सप्ताह' उत्साहात साजरा


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे 'सहकार सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित शेतकऱ्यांना सद्यस्थितीत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या संदर्भात सविस्तर व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.


आजकाल डिजिटल बँकिंगचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला बँक खात्याचा पासवर्ड, ओटीपी किंवा गोपनीय माहिती शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, याबाबत बँक अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना जागरूक केले.


या कार्यक्रमा प्रसंगी बँकेचे शाखाप्रमुख सुभाष बागल, विकास अधिकारी भवारी साहेब आणि एफएलसी (FLC) समन्वयक सागर पवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून बँकेच्या विविध योजनांची माहितीही दिली. या कार्यक्रमाला पिंगळी बुद्रुक आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*‘दरिया’ नव्हे ‘समंदर’ शोधा; दुष्काळाचे भान आणि समतेच्या जागरानं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ चा रणगजर!* *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ व ‘दिव्यांग कला महोत्सवा’चे डॉ. भरत अमळकर यांच्या हस्ते उद | *न्यायालयाच्या उंबरठ्यावर असंतोषाची ठिणगी: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज ५ नोव्हेंबरला ठप्प होण्याची शक्यता; कर्मचारी सामूहिक रजेवर जाण्याच्या तयारीत!* | नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी विजयी; सुधाकर कोहळे यांचा पराभव! | *'सुरक्षित बालपण' व्याख्यानमालेने जागविली बालकांची सजगता: सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय शिबिराची दिमाखात सांगता!* | कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध |