मोटेवाडी दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा; प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश सुपूर्द

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 01 July 2026 | 👁 241 Views
मोटेवाडी दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा; प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश सुपूर्द
मोटेवाडी, ता. जत (प्रतिनिधी): मोटेवाडी (ता. जत) येथील मरगुबाई मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक मृताच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचे धनादेश आज मोटेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात संबंधित वारसांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. आर्थिक मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, "मोटेवाडीतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय समाजातील संकटग्रस्त नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत आले आहेत. महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य दुर्घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याची त्यांची परंपरा आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने वैद्यकीय मदत दिली जाते. भविष्यातही या बाधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."

तसेच त्यांनी या मदतीसाठी आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ आणि कदम कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भिमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, नागेश मोटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्घटनेनंतर तातडीने मदतीसाठी पुढाकार घेऊन बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि भारती विद्यापीठाचे आभार मानले. संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने उभे राहून अशा कुटुंबांना आधार देणे हीच खरी मानवता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |