मंगळवेढ्यात 34 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न; कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पाणी मिळावे यासाठी एल्गार

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 26 June 2026 | 👁 80 Views
मंगळवेढ्यात 34 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न; कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पाणी मिळावे यासाठी एल्गार
राजर्षी शाहू जयंतीला मंगळवेढ्यात पाणी हक्काचा एल्गार
आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथे कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी 34 वी पाणी संघर्ष परिषद उत्साहात संपन्न झाली. विशेषतः आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या परिषदेला प्रा. शिवाजीराव काळुंगे सर, माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रमदादा सावंत, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव भाऊ नायकवडी,प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, विश्वंभर बाबर सर, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार, प्रा. दत्ताजीराव जाधव, सी. पी. गायकवाड, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिराप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज यांच्यासह परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेतील प्रमुख मुद्दे:
1. कृष्णा खोऱ्यातील कायम दुष्काळी 13 तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे.
2. आटपाडी, सांगोले, मंगळवेढा, जत या तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांना गती द्यावी.
3. टेंभू, म्हैसाळ, ताकारी योजनांचे रखडलेले काम पूर्ण करावे.
4. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना राबवावी.
प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणांचा दाखला देत सरकारने दुष्काळग्रस्त भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. माजी आमदारांनीही एकमुखाने पाणी प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.34 वर्षांपासून सुरू असलेली ही पाणी संघर्ष परिषद दुष्काळी भागातील जनतेचा आवाज बनली आहे.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |