कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. कुलाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, समानता आणि न्याय पोहोचविण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समताधिष्ठित आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे."
यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. एस.आर. कुलाळ म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, समानता आणि न्याय पोहोचविण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समताधिष्ठित आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे."
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. "शिक्षण हीच सामाजिक परिवर्तनाची खरी शक्ती आहे, हा संदेश शाहू महाराजांनी कृतीतून दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजहितासाठी कार्य केले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.शेवटी प्रा. वैभव चांडवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.