​मोका'ची कायद्याची भीती घालून पानपट्टी चालक - मालकांची लूट; सांगली जिल्हा पान असोसिएशन आक्रमक, पोलीस अधीक्षकांकडे धाव

👤 संतोष एडके तासगाव | 📅 25 June 2026 | 👁 226 Views
​मोका'ची  कायद्याची भीती घालून पानपट्टी चालक - मालकांची  लूट; सांगली जिल्हा पान असोसिएशन आक्रमक, पोलीस अधीक्षकांकडे धाव
सांगली जिल्ह्यामध्ये काही पान पट्टी चालक-मालक दुकानदारांना 'मोका' (MCOCA) कायद्याची भीती घालून, त्यांना विनाकारण त्रास देऊन आर्थिक मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायकारक आणि बेकायदेशीर वसुलीच्या विरोधात आज महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
​यावेळी झालेल्या भेटीत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षकांसमोर शहरात आणि जिल्ह्यात पान दुकानदारांना वेठीस धरण्याच्या सुरू असलेल्या घटनांचा सविस्तर पाढा वाचला. दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा प्रकारच्या खंडणीखोर प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची स्वतः गंभीर दखल घेण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, कार्याध्यक्ष युसुफ जमादार यांच्यासह राजू पागे, मयूर बांगर, मकरंद जमदाडे, प्रकाश मोरे, लिंबाजी कांबळे, सुरेश जाधव, अजिंक्य पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पान व्यावसायिक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |