वाढदिवसाचे औचित्य साधत गरजू विद्यार्थ्याला नवीन सायकल भेट; मेटकरी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 22 June 2026 | 👁 197 Views
वाढदिवसाचे औचित्य साधत गरजू विद्यार्थ्याला नवीन सायकल भेट; मेटकरी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम
"गरजू विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि त्याच्या शिक्षणाच्या प्रवासाला मिळालेली नवी गती हेच आमच्यासाठी वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यातच खरे समाधान आहे." — यशवंत मेटकरी

समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची भावना जपणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम कामथ येथे पाहायला मिळाला. युवा उद्योजक यशवंत मेटकरी यांच्या पत्नी सौ. सविता मेटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त एका गरजू विद्यार्थ्याला नवीन सायकल भेट देऊन त्याच्या शिक्षणाच्या प्रवासाला नवी गती देण्यात आली.
सौ. सविता मेटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा किंवा अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्णय मेटकरी कुटुंबीयांनी घेतला होता. याच दरम्यान जीवनदीप विद्यामंदिर, कामथ येथील शिक्षक गणेश बिडवे यांनी यशवंत मेटकरी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. शाळेत शिकणारा एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी दररोज सुमारे पाच किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत येत असल्याची माहिती त्यांनी दिली व त्याच्यासाठी सायकलीची गरज असल्याचे सांगितले.ही माहिती मिळताच यशवंत मेटकरी यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला. त्यानंतर मेटकरी कुटुंबीयांनी जीवनदीप विद्यामंदिर येथे भेट देत संबंधित विद्यार्थ्याला हिरो कंपनीची नवीन रेंजर सायकल वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेटकरी कुटुंबीयांचे स्वागत केले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. दररोजचा खडतर पायी प्रवास आता सुलभ होणार असल्याने विद्यार्थ्यालाही मोठा दिलासा मिळाला.

"एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटेतील अडचण दूर करून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यातच खरे समाधान आहे," अशी भावना यशवंत मेटकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

सौ. सविता मेटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, वाढदिवसाचा आनंद समाजहिताच्या कार्यातून साजरा करण्याचा आदर्श मेटकरी कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |