कुर्ली : केंद्र शाळा नं. १ येथे विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करताना सभापती सिद्धेश( बंटी) रावराणे व अन्य.
पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुर्ली गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजप तालुका मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैभववाडी तालुक्याचे सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. कुर्ली येथील भाजप बूथ अध्यक्ष शंतनू पाटील आणि भाजप कमिटी कुर्ली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या पहिल्याच टप्प्यात शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेत प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पं. स. सदस्य मंगेश लोके, कुर्ली सरपंचा विजया पोवार, चंद्रकांत सावंत, मारुती वैराग, अनिल सुतार, कृष्णा सावंत, कृष्णा कदम, योगेश चेंदूरकर, आदेश सूद यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.