पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 110 Views
पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती
महिला अत्याचार निवारणकक्षामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या निकिता बाळकृष्ण एडवे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
निकिता एडवे शासनाच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एडवे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्यात यशस्वी सेवा बजावली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक यांची पदे पोलिस उपनिरीक्षक संवर्गामध्ये वर्ग करण्यात आली असून त्यांना पोलिस उपनिरीक्षक संबोधण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता पोलिस दलात ३० वर्षे सेवा, सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर ३ वर्षे सेवा असे निकष होते. या अंतर्गत निकिता एडवे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
एलएलबी परीक्षेत यश संपादन करून शिक्षक संजय रांदडा व कल्पेश भोगाडे यांनी समाजाचा मान उंचावला | पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फे विविध उपक्रम | औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे मुंबई यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप | आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न | तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा | जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल येथे शालेय साहित्य वाटप | कणकवली पोलिसांची धडक कारवाई! | कुर्ली गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप | पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती |