झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष

👤 अतुल फसाले | 📅 19 June 2026 | 👁 159 Views
झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष
यापूर्वी बेलवण नदीवरील बंधारा मागील वर्षी झालेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याची पुनवृत्ती होते का असे प्रश्न शेतकरी करत आहेत .
झापाचीवाडी : मृदा व जलसंधारण विभागामार्फत सांगोला तालुक्यातील झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावर सुरू असलेल्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तसेच मंजूर निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून टेंडरबाह्य साहित्याचा वापर होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कामामध्ये आवश्यक दर्जाचे साहित्य न वापरता कमी प्रतीचे साहित्य वापरले जात असून त्यामुळे भविष्यात बांधकामाची टिकाऊपणा धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाच्या निधीतून होत असलेल्या या कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यापूर्वी बेलवण नदीवरील बंधारा वाहून गेल्याने त्याची दुरुस्ती करून दिली नाही . तेच पुन्हा होऊ नये त्यामुळे
कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, निविदेतील अटींची अंमलबजावणी तसेच कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच कामामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत जलसंधारण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरात चर्चा सुरू असून, निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष | पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत | शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा | डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे | आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत | आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी | माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत, | "वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश |