विधानपरिषद मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानास रवाना

👤 राहुल टिबे सांगली | 📅 18 June 2026 | 👁 67 Views
विधानपरिषद  मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे  सर्व नगरसेवक मतदानास रवाना
विधानपरिषद मतदानासाठी आनंदराव पवार बापूंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नगरसेवक मतदानास रवाना
आज ईश्वरपूर येथे उरुण ईश्वरपूर नगरपरिषद, आष्टा नगरपालिका, आणि शिराळा नगरपंचायत येथील शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय मार्केट यार्ड ईश्वरपूर येथून शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी रवाना झाले. तत्पूर्वी आनंदराव पवार बापूंनी सर्व नगरसेवक मतदार बंधू भगिनींचे स्वागत केले तसेच सर्व मतदारांना भगवे फेटे नेसवण्यात आले. त्यानंतर कार्यालय बाहेर सर्वांनी एकत्र येऊन महायुतीचा विजय असो अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर तहसील कार्यालय येथे मतदानासाठी रवाना झाले. यावेळी शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक, प्रसाद लाड आदी उपस्थित होते

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश | जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड | नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा | शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती | स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा | शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव व पूर्वतयारी मेळावा संपन्न | नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित | कनेडी प्रशालेत 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात साजरा; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत |