प्रमुख पाहुणे डॉ. आर. एस. बनसोडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, "शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित केले. ग्रामीण भागातील व वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे."
राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. एस. बनसोडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व मानवतावादी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली व प्रमुख पाहुण्यांचे औपचारिक स्वागत केले.
प्रमुख पाहुणे डॉ. आर. एस. बनसोडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, "शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित केले. ग्रामीण भागातील व वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "शिक्षणमहर्षींनी दिलेली संस्कारमूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. ज्ञानासोबतच चारित्र्यनिर्मितीवर भर देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले की, "महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी रुजविलेली मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे."
कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.