दलित पँथरच्या माण तालुकाध्यक्षपदी छत्रपती भोसले यांची निवड!

👤 आकाश दडस सातारा | 📅 05 June 2026 | 👁 159 Views
दलित पँथरच्या माण तालुकाध्यक्षपदी छत्रपती भोसले यांची निवड!
शिखर शिंगणापूरसह तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह; अभिनंदनाचा वर्षाव
दलित पँथर या आक्रमक आणि सामाजिक चळवळीतील अग्रगण्य संघटनेच्या माण तालुकाध्यक्षपदी शिखर शिंगणापूरचे सुपुत्र छत्रपती भोसले यांची नुकतीच जाहीर निवड करण्यात आली. या निवडीचे वृत्त समजताच शिखर शिंगणापूर परिसरासह संपूर्ण माण तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी छत्रपती भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी छत्रपती भोसले निवडीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष छत्रपती भोसले म्हणाले, "तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, अपंग, निराधार आणि विधवा महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ त्वरित पोहोचवणे याला माझे पहिले प्राधान्य असेल. दलित पँथरचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करेन."दलित पँथरचे कार्य आणि उद्दिष्टे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रबोधन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना थेट कामाची दिशा दिली जात असून, माण तालुक्यातही आता या कामाला गती मिळणार आहे.नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष छत्रपती भोसले यांच्या नेतृत्वाखाली माण तालुक्यात दलित पँथर संघटना अधिक आक्रमकपणे आणि सक्षमतेने काम करेल, तसेच सर्वसामान्य व वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी नेहमी तत्पर राहील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भोसले यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |