माहिती न मिळाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण

👤 अतुल फसाले | 📅 05 June 2026 | 👁 207 Views
माहिती न मिळाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण
घेरडीत अनिल मोटे यांचा ‘बॅनरमुक्त’ सत्याग्रह; 88 दिवसांपासून विकासकामांची माहिती प्रलंबित


घेरडी, ता. सांगोला ग्रामपंचायत घेरडी येथील सन 2021 ते 2026 या कालावधीतील विकासकामांची माहिती मिळावी यासाठी अर्ज करूनही तब्बल 88 दिवस उलटून माहिती उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थ अनिल तानाजी मोटे यांनी गुरुवारी (दि. 4) सकाळी 9 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

अनिल मोटे यांनी 7 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतीकडे विकासकामांच्या माहितीसाठी अर्ज सादर केला होता. मात्र, निर्धारित कालावधीनंतरही माहिती न मिळाल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन पूर्णपणे शांततामय असून उपोषणस्थळी कोणताही वैयक्तिक बॅनर, पोस्टर किंवा फलक लावण्यात आलेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी अथवा गोंधळ न करता ‘बॅनरमुक्त सत्याग्रह’ सुरू करण्यात आला आहे.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगोला पोलिसांचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. सायंकाळी 8 वाजेपर्यंत अनिल मोटे हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवर उपोषणास बसून होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

याबाबत बोलताना अनिल मोटे म्हणाले, “माझा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नाही. ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत माहिती मिळणे हा नागरिक म्हणून माझा अधिकार आहे. 7 मार्च रोजी अर्ज करूनही आजपर्यंत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे नाईलाजाने शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने नियमानुसार माहिती उपलब्ध करून द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे.”

दरम्यान, उपोषणाची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते आणि मागणीवर काय निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |