पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या पाठपुराव्याला यश; काकडवाडी हद्दीतील पालखी मार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामांना वेग

👤 संकेत तुकाराम सानप (मुंबई मंत्रालय) | 📅 29 May 2026 | 👁 736 Views
पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या पाठपुराव्याला यश; काकडवाडी हद्दीतील पालखी मार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामांना वेग
संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील विविध गावांना जोडणारा तसेच काकडवाडी हद्दीतील महत्त्वाचा पालखी मार्ग अखेर दुरुस्तीच्या कामामुळे चर्चेत आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेली रस्ता दुरुस्ती व साईड पट्ट्या बुजविण्याच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल गायकवाड यांच्याकडे पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी निवेदनाद्वारे सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पालखी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः आषाढी वारीच्या काळात या मार्गावरून लाखो वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात सहभागी होत पायी प्रवास करत असतात. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने या प्रश्नाला वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्ती तसेच साईड पट्ट्या बुजविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, वारकरी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पालखी मार्गाचे डांबरीकरण आणि कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या या पाठपुराव्याला विविध वर्तमानपत्रे, वेब पोर्टल आणि यूट्यूब माध्यमांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |