देवगडमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी महास्वच्छता मोहिम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 May 2026 | 👁 14 Views
देवगडमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी महास्वच्छता मोहिम
४ जूनच्या महास्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे – गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांचे आवाहन
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच पंचायत समिती देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात ४ जून २०२६ रोजी विशेष महाश्रमदान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच विविध शासकीय विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केले आहे.
तालुक्यात ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण वाढवणे, गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच स्वच्छतेची लोकचळवळ उभारणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वच्छ आणि निरोगी गावांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
सदर महास्वच्छता मोहीम ४ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते तसेच कचरा साचणारी ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच प्लास्टिक कचरा निर्मूलन, परिसर स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन “स्वच्छ गाव – सुंदर गाव” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. |