मार्डी गावच्या अमोल ढवळेची मुंबई पोलीस दलात निवड!

👤 आकाश दडस सातारा | 📅 28 May 2026 | 👁 204 Views
मार्डी गावच्या अमोल ढवळेची मुंबई पोलीस दलात निवड!
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर माण तालुक्यातील मार्डी गावचे सुपुत्र अमोल संगीता बाळासाहेब ढवळे यांनी यश मिळवत मुंबई पोलीस दलात स्थान पटकावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मार्डी गावासह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक प्रवास आणि पार्श्वभूमी
अमोल ढवळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी येथे झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण छत्रपती विद्यालय, मार्डी येथून पूर्ण केले. पुढील अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय, देवापूर येथून पूर्ण केले. उच्च शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी सातारा येथील गौरीशंकर कॉलेजमधून अभियांत्रिकीची (Engineering) पदवी संपादन केली.
अभियांत्रिकी सोडून खाकीचे स्वप्न:
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुण कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळतात. मात्र, अमोल यांनी देशसेवा आणि खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पदवी पूर्ण होताच त्यांनी पोलीस भरतीचा सराव आणि अभ्यासाला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, मैदानी सराव आणि लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून त्यांनी मुंबई पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले.
सर्व स्तरांतून कौतुक
ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या मुलाने उच्च शिक्षण घेऊनही पोलीस दलात मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. अमोल यांच्या या यशाबद्दल मार्डी गावचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी |