जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की; मारहाणीची चर्चा

👤 जत प्रतिनिधी | 📅 26 May 2026 | 👁 194 Views
जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की; मारहाणीची चर्चा
जत येथील पंचायत समिती आवारात आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद पुढे धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती परिसरात दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. तुम्ही विद्या मोटे यांना जतमध्ये का घेऊन आलात तसेच समाजामध्ये भांडणे लावू नका अशा कारणांवरून हा वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचेही बोलले जात आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित मारहाण झालेल्या व्यक्तीकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडूनही कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही पंचायत समिती परिसरातील या कथित प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विद्या मोटे यांच्या सक्रियतेमुळे जतच्या राजकारणात नवी समीकरणे?
जत तालुक्यात शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांच्या वाढत्या दौऱ्यांमुळे आणि आपत्तीग्रस्त भागातील भेटींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आणि विद्या मोटे समर्थकांमध्ये झालेल्या कथित वादानंतर विद्या मोटे यांच्या एंट्रीमुळे आमदार पडळकर यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
मात्र, या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. तरीही आगामी स्थानिक राजकारणात विद्या मोटे यांच्या वाढत्या सक्रियतेचा परिणाम दिसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |