सध्या गॅस टंचाई आहे .बुकिंग शिवाय गॅस दिला जात नाही. परंतु गॅस बुकिंग असून सुद्धा व बुकिंग नंबर गॅस एजन्सी ला देऊन सुद्धा गॅस सिलेंडर देण्यास टाळाटाळटाळ करीत आहेत. अशा एजन्सी विरोधात संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
म्हसवड येथील शुभम गॅस एजन्सी या एजन्सीचे झरे परिसरामध्ये अनेक गॅस कनेक्शन आहेत .अलीकडच्या काळामध्ये गॅस बुकिंग केल्याशिवाय किंवा बुकिंग नंबर दिल्याशिवाय गॅस मिळत नाही. असा नियम असला तरी झरे परसरातील एका ग्राहकाने गॅस बुकिंग केला होता . गॅस बुकिंग नंबर देऊनही त्या ग्राहकाला गॅस देण्यास टाळाटाळ केली.
मोबाईल नंबर बरोबर आहे बुकिंग नंबर बरोबर आहे परंतु तुमच्याकडे पुस्तक का नाही ? पुस्तक असेल तरच गॅस दिला जाईल अशी अरेरावीची भाषा शुभम गॅस एजन्सी चे कर्मचारी व मालक करीत आहेत.
गॅस बुकिंग झाल्यानंतर ऑनलाईन डीएससी नंबर येतो त्यानंतर त्याची स्लिप गाडी बरोबर येत असते. बुकिंग नंबर आहे .त्याची स्लिप आहे मग सिलेंडर देण्याला अडचण काय ? पुस्तकाचाच हट्ट कशासाठी मालक करतात हा गंभीर प्रश्न आहे.
सर्वच ग्राहक सुशिक्षित आहेत असे नाही समोरचा ग्राहक अडाणी आहे असे समजून त्या ग्राहकाला कोणत्यातरी कारणाने गॅस सिलेंडर देण्यास नकार घ्यायचा आणि तोच गॅस सिलेंडर दुसऱ्या इतर बुकिंग नसणाऱ्या ग्राहकांना जादा दराने विकायचा हा व्यवसाय एजन्सी वाल्यांचा सुरू आहे.
याची कसून चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.