अवकाळीचा फटका; आंधळी येथे टोमॅटो बागेचे अतोनात नुकसान, पंचनाम्याची मागणी

👤 आकाश दडस सातारा | 📅 26 May 2026 | 👁 226 Views
अवकाळीचा फटका; आंधळी येथे टोमॅटो बागेचे अतोनात नुकसान, पंचनाम्याची मागणी
माण तालुक्यातील आंधळी गावामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले असून, यामुळे येथील प्रयोगशील शेतकरी जयकुमार दडस यांच्या टोमॅटोच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, अद्याप महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आंधळी येथील शेतकरी जयकुमार दडस यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर व तार-बांबूचा आधार (स्टेकिंग) देऊन मोठ्या कष्टाने टोमॅटोची बाग फुलवली होती. बाग सध्या चांगल्या बहरात असून झाडांना मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागलेले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या अचानक अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे टोमॅटोचे उभे पीक जमिनीदोस्त झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे टोमॅटोला आधार दिलेले बांबू आणि तारा तुटून पडल्या आहेत, ज्यामुळे झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे मोडून पडल्याने व फळे मातीला मिळाल्याने ती सडण्याची भीती निर्माण झाली आहे.


शेतकरी जयकुमार दडस यांनी या बागेसाठी खते, औषधे, मल्चिंग आणि मजुरी असा लाखो रुपयांचा भांडवली खर्च केला होता. मात्र, हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे दडस यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या तोट्यातून कसे सावरायचे, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

एवढे मोठे नुकसान होऊनही अद्याप कृषी विभाग किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या भागाची पाहणी केलेली नाही. शासनाने तात्काळ या बागेचा पंचनामा करून दडस यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आंधळी गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वेळेत पंचनामा न झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आणि सरकारी मदतीचा लाभ मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |