विजेच्या धक्क्याने सुप्रसिद्ध घोड्याचा मृत्यू घटनेची नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांच्याकडून गंभीर दखल

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 25 May 2026 | 👁 268 Views
विजेच्या धक्क्याने सुप्रसिद्ध घोड्याचा मृत्यू घटनेची नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांच्याकडून गंभीर दखल
आटपाडी : शहरातील साठे नगर परिसरात तार तुटून झालेल्या विजेच्या धक्क्यामुळे रवी लांडगे यांचा सुप्रसिद्ध घोडा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत आटपाडीचे नगराध्यक्ष माननीय यू. टी. जाधव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणचे अधिकारी राजेश डावरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर सोमेश्वर गाढवे यांना देखील आवश्यक सहकार्य करण्याबाबत सूचित करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी वीज यंत्रणेची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष जाधव यांनी केली.
मृत्युमुखी पडलेला घोडा हा विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आकर्षणाचे केंद्र होता. या घटनेमुळे लांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना शासकीय मदत व आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी दिले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |