आटपाडी तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष"

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 22 May 2026 | 👁 379 Views
आटपाडी तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष"
“अधिकारी / कर्मचारी जोमात, सर्वसामान्य जनता मात्र कोमात” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आटपाडी तहसील कार्यालयातील भोंगळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे.
आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागरिक तहसील कार्यालयात विविध कामांसाठी उपस्थित झाले असता, अनेक कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. दुपारी तब्बल 2.45 वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात न आल्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. याबाबत विचारणा केली असता “सर्व्हर डाऊन आहे” असे कारण देण्यात आले.
दरम्यान, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सौ. यशोदा बापू कोळी (वय 76) यांच्या उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र आजअखेर संबंधित दाखला देण्यात आलेला नाही. सदर प्रकरण तहसील कार्यालयातील वाघमोडे मॅडम यांच्या टेबलवर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
दिनांक 20 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता “सर्व्हर डाऊन आहे” तसेच “दाखला देण्याची मुदत 15 दिवसांनंतर आहे” असे उत्तर देऊन अर्जदारांना परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे हा दाखला दिव्यांग व्यक्तीच्या पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असूनही प्रशासनाने कोणतीही संवेदनशीलता दाखवली नसल्याचा आरोप होत आहे.
शासन स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागणूक देण्यासाठी विविध कायदे आणि योजना राबवल्या जातात. दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात काही अधिकारी आणि कर्मचारी सामान्य जनतेची पिळवणूक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा युवक आघाडीचे उपाध्यक्ष शरद वाघमारे यांनी मा. मुख्यमंत्री, मा. मानव अधिकार आयोग तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली ही व्यथा मांडत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |