ॲड. विद्याताई मोटे यांना विधान परिषदेला संधी मिळावी.. कार्यकर्त्यांची मागणी

👤 राहुल टिबे सांगली | 📅 22 May 2026 | 👁 431 Views
ॲड. विद्याताई मोटे यांना विधान परिषदेला संधी मिळावी.. कार्यकर्त्यांची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिलांच्या अनेक अडचणी घरोघरी जाऊन सोडणाऱ्या सामाजिक कार्याची भान असणाऱ्या तसेच सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला घाहून जाणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील एडवोकेट विद्यालय मोटे यांना विधान परिषदेला संधी द्यावी अशी महिला वर्गातून व कार्यकर्त्यातून मागणी जोर धरू लागली आहे.
शिवसेना पक्षात अनेक महिलांना मोठी संधी उपलब्ध झाली मात्र पश्चिम महाराष्ट्रात म्हणावे तसे महिला वर्गाला स्थान शिवसेनाच्या माध्यमातून मिळाले नाही.. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आश्चर्यकारक ज्योती वाघमारे यांचे नाव समोर आले .त्यातून जनतेला एक संदेश गेला की सामान्य कार्यकर्त्यांना मोठी करणारी शिवसेना.... बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठमोठी पदे दिली.होती.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत एकनाथ शिंदे देखील तोच रथ पुढे चालवत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र तसा सुजलाम सुफलाम सर्वाधिक साखर कारखाने असोत व अनेक मोठमोठ्या एमआयडीसी असोत याच पश्चिम महाराष्ट्रात एक असा हिरा जन्मला त्यांचे नाव आयआरएस डॉ सचिन मोटे यांचा संघर्ष हाच जन्मापासूनच घरी परिस्थिती हालाखीची मात्र शिक्षण घ्यायची जिद्द चिकाटी भरपूर कठीण परिस्थिती असताना देखील सरांनी शिक्षण घेत यशाचा शिखर सर करत राहिला परिस्थितीला देखील त्यांच्या समोर हात टेकावे लागले कारण संघर्षाच्या परिस्थितीत देखील एमबीबीएस डॉक्टरचे शिक्षण पुर्ण केले.
त्यानंर एल एल बी देखील पूर्ण केली काही दिवस मुंबईतील मोठ्या रूग्णालयात नोकरी देखील केली. सांगली जिल्ह्यातील विभूतवाडी हे गाव, गावावरून भरपूर लोक उपचारासाठी मुंबईत येत होते. परिस्थितीची जाण काबाडकष्ट करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्या वेळी भेटायचे त्या वेळी मनाने मात्र पुर्ण खचायचे कारण ती व्यक्ती डॉ.सचिन मोटे यांच्याकडे एका अपेक्षेने भेटत होती. आपल्या परिने त्यांना भरपुर मदत करत असत परंतु म्हणावे अशी सेवा डॉ.मोटे यांना करता येत नव्हती.
मनात जिद्द खुप होती पण ठरवले आत्ता फक्त सामान्य जनतेसाठी जगायचे त्यासाठी आपण प्रशासनाचा भाग व्हायला हवे हे समजले .डॉ मोटे युपीएससी चा अभ्यास करायला सुरू केला आणि काही दिवसांनी तो पल्ला देखील यशस्वी केला व आयआरएस झाले सचिन मोटे ते आर आर एस सचिन हा प्रवास ईतका सोपा नव्हता पण आपल्या जिद्दीने व धैर्याने तो सर केला.
पोस्टिंग हि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मातीत मिळाली ठरवले आपल्याला कडे अपेक्षेने येणाऱ्या प्रत्येकाला मदत केली पाहिजेत भेटायला गावगाड्यातील सामान्य शेतकरी,दुध उत्पादन , कष्टकरी,मजुर , माथाडी कामगार , हमाल , विद्यार्थी , नोकरदार कुणीही असो तो कोण आहे कोणत्या गावचा आहे कोणत्या जातीचा याचा विचार केला नाही. त्याचे काम तडीस नेले व ते पुर्ण केले.. एखाद्याला आर्थिक अडचण निर्माण झाली तल सढळ हाताने मदत करतात..
अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले शिकवले तेच विद्यार्थी आज मोठमोठी पदावर कार्यरत आहेत हिच कामाची पोचपावती.. मुंबईत डॉ सचिन अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहेत परंतु ज्या मातीत आपल्या जन्म झाला ज्या मातीने आपल्याला घडवले त्या मातीसाठी काही तर करावे या भावनेने गावच्या अडचणी जाणून घेत असत सर सुट्टीत घरी आल्यानंतर पंचक्रोशीतील हजारो लोक भेटायला येत असत आपल्या अडचणी घेऊन पण आपल्या परीने होईल तेवढी मदत करत असत... असं बोललं जातं प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एका स्त्रीचा मोठा वाटा असतो असाच डॉ सचिन मोटे यांच्या यशामागे ॲड विद्याताईं मोटे यांचा फार मोठा वाटा आहे. प्रत्येक वाटचालीतील गंभीरपणे पाठीशी असलेल्या विद्याताई देखील गावगाड्यातील , परिसरातील, पंचक्रोशीतील लोक विद्याताईंना भेटत व आपली कैफियत मांडत असत.. पतीकडुन चालत आलेला एवढा मोठा वारसा डॉ मोटे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत विद्याताई देखील सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करायला लागल्या त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागल्या परिसरातील गावागावात आदरणीय विद्याताई फिरू लागल्या लोकांच्या अडचणी दूर करू लागल्या.
लोक देखील मोठ्या अपेक्षेने विद्याताईंना भेटु लागले मोठा जनसंपर्क वाढत गेला हळूहळू आटपाडी तालुक्यातील जनमानसात विद्याताई लोकप्रिय होत गेल्या आपल्या फाउंडेशन च्या माध्यमातून हजारो लोकांना विद्याताई मदत करू लागल्या त्यातुनच मिळणार जनतेचा अफाट प्रतिसाद विद्याताईंच्या कामाची पोचपावती मिळू लागली. जर सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हायले हवेत हे जनतेने ओळखले व जनतेच्या आग्रहाखातर विद्याताईंनी सामान्य माणसाचा विचार करणाऱ्या लाडक्या बहिंणींच्या लाडक्या भावांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ताईंनी ठरवले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागल्या अफाट प्रतिसाद जनमानसातुन मिळू लागला कालांतराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ताई उभारल्या समोर मातब्बर मंडळी मात्र जनतेच्या जिवावर निवडणूक लढवली होती.
पण थोडाथोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र जनसेवेच्या व्रत हाती घेतलेल्या ताई दुसऱ्या दिवसापासून जनसामान्यांच्या कामात झोकून देऊन काम करू लागल्या पक्षाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या भागात प्रवास करू लागल्या... बाबासाहेब बोलायचे २० टक्के राजकारण ८० टक्के राजकारण याच गोष्टीचा अवलंब करत ताई स्वतःला झोकून देऊन आजतागायत पक्षासाठी व समाज्यासठी लढत आहे अनेक खालच्या पातळीवर विरोधकांकडून टिका टिप्पणी होते मात्र ताई कुठही न खचता आपल्या कामातून उत्तर देतात.
धनगर समाजाला एसटी मधुन आरक्षण मिळवण्यासाठी अनेकदा आंदोलने करतात. समाज्याच्या उन्नतीसाठी झोकून देऊन प्रयत्न करत आहेत सामान्य गावगाड्यातील शेतकरी कष्टकरी महिला वर्गाला मनापासून वाटतंय आपल्या ताई महाराष्ट्र राज्याच्या उच्च सभागृहात गेल्या तर आपल्या लाडक्या बहिंणींचा आवाज तिथं पोहचले.. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून एक महिला नेत्या म्हणून पुढे येतील... कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी देखील पक्षवाढीसाठी महिला फार मोठी संधी ताईंच्या माध्यमातून उपलब्ध होईल... शिवसेना हि सामान्य माणसाची म्हणून ओळखले जाते त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे विधान परिषदेला मला संधी देतील अशी अपेक्षा आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |