कणकवलीत कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराची संधी ...'यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 186 Views
कणकवलीत कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराची संधी ...'यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'
आजच्या बदलत्या काळात केवळ पदवी असून चालत नाही, तर हाताला कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी स्वरूपातील टेक्निकल संस्था 'यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' कणकवलीत सुरू करण्यात आली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये १ जूनपासून विविध कौशल्य विषयक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार असून, यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नुकत्याच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे प्राचार्य अमर पारकर आणि प्रा. प्रवीण सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रा. शैलेश भोगले, प्रा. राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

वयाची अट नाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शैक्षणिक कर्ज!

या संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कौशल्य विषयक शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती येथे येऊन तांत्रिक शिक्षण घेऊ शकतात. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज (Education Loan) उपलब्ध करून दिले जाणार आहे.

'स्टार्टअप' आणि व्यवसायासाठी खास मार्गदर्शन

पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. प्रवीण सावंत म्हणाले, योग्य वयात तांत्रिक शिक्षण घेतले तर तरुण लवकर कुशल बनतात. आज सरकारी क्षेत्रासोबतच खाजगी क्षेत्रातही अद्ययावत तांत्रिक मनुष्यबळाची प्रचंड गरज आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना फक्त नोकरीवर अवलंबून राहावे लागू नये, म्हणून तज्ज्ञांकडून 'स्टार्टअप' आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाईल.

२,४ आणि ६ महिन्यांचे रोजगाराभिमुख कोर्सेस:

संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार खालील कोर्सेस उपलब्ध आहेत:

६ महिन्यांचे कोर्सेस: प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग (AC), वेल्डर अँड फॅब्रिकेशन.

४ महिन्यांचे कोर्सेस: इलेक्ट्रो-प्लंबर, इलेक्ट्रो-वेल्डर, सोलर-इलेक्ट्रिशियन.

२ महिन्यांचे कोर्सेस: मोबाईल रिपेरिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर रिपेरिंग अँड नेटवर्किंग.

महिलांसाठी विशेष कोर्सेस: ब्युटिशियन, शिवणकाम, पर्सनल केअर असिस्टंट.

आत्मनिर्भर होण्याचे आवाहन!

तांत्रिक शिक्षणामुळे तरुण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम बनतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच वयोगटातील व्यक्तींनी आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन प्राचार्य अमर पारकर आणि प्रा. प्रवीण सावंत यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |