कुळकजाई येथील श्री माणगंगा विद्यालयाला 'गेट टुगेदर' निमित्त भेट

👤 आकाश दडस सातारा | 📅 21 May 2026 | 👁 294 Views
कुळकजाई येथील श्री माणगंगा विद्यालयाला 'गेट टुगेदर' निमित्त भेट
शिंगणापूर पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे आयकॉन असलेल्या येथील 'श्री माणगंगा विद्यालय, कुळकजाई' (ता. माण, जि. सातारा) येथे एसएससी (SSC) बॅच २००२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट टुगेदर) अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभूमीबद्दल आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवला.


अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेले आपले सामाजिक दायित्व ओळखून विद्यालयाला एका विशेष वस्तूची भेट दिली. 'एकमेका सहाय्य करू अवघू धरू सुपंथ' या सुवचनाचे पालन करत, सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत या उपक्रमाचे आयोजन केले होते.



या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. पुरुषांनी पांढरा शुभ्र पोशाख आणि डोक्यावर केसरी फेटा, तर महिलांनी पारंपरिक साडी आणि फेटा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक जण भावुक झाले होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एकमेकांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.



माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या आपुलकीबद्दल आणि शाळेला दिलेल्या या भेटीबद्दल (सौजन्य) शिंगणापूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी एसएससी बॅच २००२ च्या सर्व युवक-युवतींचे विशेष कौतुक केले व त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा सोहळा म्हणजे आजच्या पिढीसाठी आपल्या शाळेप्रती आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी, याचा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |