पुण्यात 'भारत श्री कार्य गौरव' सोहळा उत्साहात संपन्न; पत्रकार, साहित्यिक राहुल खरात यांच्यासह मान्यवरांचा गौरव!

👤 राहुल खरात पुणे | 📅 20 May 2026 | 👁 286 Views
पुण्यात 'भारत श्री कार्य गौरव' सोहळा उत्साहात संपन्न; पत्रकार, साहित्यिक राहुल खरात यांच्यासह मान्यवरांचा गौरव!
हा पुरस्कार म्हणजे माझ्या लेखणीचा आणि समाजप्रबोधनाच्या चळवळीचा सन्मान आहेआज आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून कष्ट, समर्पण आणि अहोरात्र झटणाऱ्या हातांचा जो गौरव पुण्यात झाला, तो थक्क करणारा आहे. यवतमाळच्या भीमकन्या मनीषा कांबळे यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षिका-लेखिका आणि इतर सर्व गुणवंतांसोबत एकाच मंचावर सन्मानित होताना मनाला प्रचंड आनंद होत आहे. 'कार्य सन्मान... राष्ट्राचा अभिमान!' हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र श्रम कामगार संघटनेने अगदी वेळेचे अचूक नियोजन करून हा सोहळा नेटका पार पाडला, हे कौतुकास्पद आहे. हा पुरस्कार माझ्यावरील सामाजिक जबाबदारी आणखी वाढवणारा असून, समाजप्रबोधनाचे हे कार्य भविष्यातही अधिक ऊर्जेने सुरू राहील, हाच विश्वास या निमित्ताने देतो." ​— राहुल खरात (पत्रकार व साहित्यिक)
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र श्रम कामगार संघटना (रजि.) आणि भारत श्री कार्य गौरव सोहळा समितीच्या वतीने पुण्यात रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंतांना मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'कार्य सन्मान... राष्ट्राचा अभिमान!' हे ब्रीद घेऊन नवी पेठ येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात, पत्रकार व साहित्यिक मा. राहुल खरात (आटपाडी-पुणे) यांना त्यांच्या प्रगल्भ कार्यक्षमतेबद्दल आणि राष्ट्रप्रेरणेतून केलेल्या समाजप्रबोधनाबद्दल 'भारत समाज गौरव पुरस्कार २०२६' देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
​त्याचबरोबर यवतमाळच्या शिक्षिका व पत्रकार मनीषा कांबळे, अमरावतीच्या सोनाली मेश्राम आणि पुण्याच्या योगिता कोठेकर यांच्यासह अनेक मान्यवरांना त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक कार्याची तळमळ लक्षात घेऊन गौरविण्यात आले. भव्य मानचिन्ह, आकर्षक सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
​चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती
​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेते व निर्माते मा. मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तसेच 'साधी माणसं' मालिकेतील 'रवी'ची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश घारे आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली.
​वेळेचे नियोजन आणि सुटसुटीत कार्यक्रम
​या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख वक्त्यांनी भाषणांमध्ये फाफटपसारा न लावता अगदी कमी वेळात, मोजक्या शब्दांत सर्वांचे कौतुक केले व सन्मान केला. सातारा येथून खास शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रा. प्रतिभा गजरमल यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विजेत्यांचे कौतुक केले. सर्वच मान्यवरांनी वेळेचे चंतोबा पाळल्यामुळे हा भव्य कार्यक्रम अगदी वेळेत आटोपता आणि नेटका झाला, ज्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
​विविध पुरस्कारांचे वितरण
​आयएसओ (ISO 9001:2015) मानांकित असलेल्या महाराष्ट्र श्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोदक आणि कार्य प्रमुख समितीच्या वतीने या कार्यक्रमात महाराष्ट्र श्रमभूषण, महाराष्ट्र युवा आयकॉन स्टार अवॉर्ड, छत्रपती शिव गौरव पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती पुरस्कार, आणि दादासाहेब फाळके कलारत्न पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
​कष्ट, समर्पण आणि कर्तृत्वाच्या भावनेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली. पुरस्कार विजेत्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |