चीज अनालॉग वापराचा मेन्यूत स्पष्ट उल्लेख बंधनकारक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 17 April 2026 | 👁 49 Views
चीज अनालॉग वापराचा मेन्यूत स्पष्ट उल्लेख बंधनकारक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
चीज अनालॉग वापराचा मेन्यूत स्पष्ट उल्लेख बंधनकारक
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोलापूर, दि. १७ एप्रिल : सोलापूर जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांना ‘चीज अनालॉग’ वापराबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, कोणत्याही अन्नपदार्थात चीज अनालॉगचा वापर केला असल्यास, त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्ड तसेच डिस्प्ले बोर्डवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम १८ (१) (e) नुसार ग्राहकांना ते जे अन्न खातात त्याबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके (Labelling and Display) नियम २०२० मधील प्रकरण २ मधील नियम ९ (६) नुसार अन्न विक्रेत्यांनी ग्राहकांना अन्नातील घटक व पोषणविषयक माहिती स्पष्टपणे देणे आवश्यक आहे.

प्रेस नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अन्न उत्पादक व पुरवठादारांनी चीज अनालॉगचा वापर करताना पॅकेजिंग व लेबलिंगवर त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच विक्री बिलावरही ‘चीज अनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

जर एखाद्या आस्थापनात चीज ऐवजी चीज अनालॉग वापरून त्याचा उल्लेख न करता पदार्थ विक्रीस ठेवले जात असल्याचे आढळून आले, तर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसायिकांनी आपल्या आस्थापनांमध्ये चीज अनालॉगचा वापर असल्यास तो मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड व बिलावर स्पष्टपणे नमूद करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |