यश रामपूरकर यांचे NEET-UG 2026 मधे घवघवीत यश.....!

👤 बळीराज भराडे परभणी | 📅 20 July 2026 | 👁 137 Views
यश रामपूरकर यांचे NEET-UG 2026 मधे घवघवीत यश.....!
अथक परिश्रम जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर जिंतूर येथील चि. यश बाळासाहेब रामपूरकर यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2026 मध्ये घवघवीत यश संपादन करत रामपूरकर कुटुंबासह संपूर्ण परीवारांचा सामान उंचावला आहे. यश रामपूरकर ने उल्लेखनीय यशामुळे रामपूरकर परिवारात आनंदाची वातावरण निर्माण झाले असून त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जाहीर केलेल्या निकालानुसार यशने 720 पैकी 593 गुण मिळवत 99. 3676168 परसेंटाइल्स प्राप्त केला आहे. याशिवाय त्याने ऑल इंडिया रँक 12636 तसेच ओबीसी रँक 57 85 मिळवत
वैद्यकीय क्षेत्रांच्या शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत यश रामपूरकर ने आपल्या अथक मेहनतीचे सोने केले आहे. त्याच्या मेहनती मागे शिस्तबद्ध अभ्यास, वेळेची योग्य नियोजन, पालकाची सातत्यपूर्ण प्रोत्साहन, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द व चिकाटी हे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले. या यशामुळे रामपूरकर कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार,पञकार, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात तो एक कुशल संवेदनशील आणि समाजाभिमुख डॉक्टर म्हणून रुग्ण सेवेंच्या माध्यमातून नाम नाव कमावेल असा विश्वास सर्वांकडून व्यक्त केला जात आहे .यावेळी यश चा आयआयबी या शिक्षण संस्थेतर्फे सेलिब्रेशन करून सत्कार ही आयोजित केला त्याचा फेटा, स्नेहांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या आनंददायी क्षणाला उपस्थितांनी त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्याच्या आनंद उत्साहात साजरा केला. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रामपूरकर परिवारातील पहिलाच एकमेव MBBS डॉक्टर होण्यांचा मान त्याने मिळवला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |