उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 10 September 2026 | 👁 41 Views
उरुण- ईश्वरपुर मध्ये  MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा
MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उरुण- ईश्वरपूर येथे विद्यार्थ्यांचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि मागण्यांचे फलक घेत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.मोर्चादरम्यान “MPSC विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व वेळेत राबवावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.मोर्चामध्ये युवक-युवतींची मोठी उपस्थिती असल्याने परिसरात विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |